नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७१४
भजन या नासिलें हेंडि । दंभा लडी आवडी ॥१॥
जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥ध्रु.॥
एकाएकीं इच्छी पाठ । नेणे चाट काउळे ॥२॥
तुका म्हणे मुलाम्याचें । बंधन साचें सेवटीं ॥३॥
अर्थ
लबाड लोकांनी दंभाची आवड धरुन भजन जरी केले तरी त्या नीच लोकांनी केलेले भजन नासते. जो मनुष्य आयता झालेला स्वयंपाक सेवन करत नाही कारण ते परान्न आहे त्यामुळे मी ते सेवन करणार नाही असे नाटक करतो आणि केवळ ताक घुसळवून पितो असा मनुष्य नीच आहे. जो मनुष्य आपला कोणताही अधिकार नसताना एकाएकी आपल्याला मान मिळावा सन्मान मिळावा अशी इच्छा बाळगतो तो मनुष्य देखील नीच असून मूर्ख कावळयासारखेच त्याचे वर्तन असते. तुकाराम महाराज म्हणतात, “जो मनुष्य केवळ परमार्थाचा मुलामा लावून केवळ परमार्थाचे सोंग आणतो त्याला शेवटी यमाचेच वंदन मिळत असते.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
