२६१६, अभंग :- त्यांचिया चरणा माझे दंडवत । ज्यांचे धनवित्त पांडुरंग:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२६१६
त्यांचिया चरणा माझे दंडवत । ज्यांचे धनवित्त पांडुरंग ॥१॥
तेथे माझा जीव पावला विसांवा । म्हणऊनि हांवा भरलोसे ॥ध्रु.॥
चरणींचे रज लावीन कपाळा । जी पदे राउळा सोई जाती ॥२॥
आणिक ती भाग्ये येथे कुरवंडी । करुनियां सांडी इंद्राऐसी ॥३॥
वैष्णवांचे घरी देवाचे वसति । विश्वास हा चित्ती सर्वभावे ॥४॥
तुका म्हणे सखे हरीचे जे दास । आतां पुढे आस दुजी नाही ॥५॥

अर्थ

ज्यांचे धन वित्तच पांडूरंग आहे त्या चरणांना माझे दंडवत असो. त्या ठिकाणी माझा जीव विश्रांत पावला असून त्याच ठिकाणच्या इच्छेने मी भरलो गेलो आहे. ज्यांची पावले हरीचे मुख पाहण्याकरता राऊळाकडे म्हणजे देवळाकडे जातात त्यांच्या चरणाचे रज म्हणजे माती मी माझ्या कपाळाला लावीन. आणि मी त्यांच्यावरुन इंद्रपदासारखे भाग्य देखील ओवाळून टाकीन. माझ्या चित्तामध्ये असा पूर्ण सर्वभावे दृढविश्वास आहे की वैष्णवांच्या घरी देवाची वस्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जे हरीचे सखे आहेत त्यांचा मी दास व्हावे यापेक्षा माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading