नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५९९
काय वृंदावन माखियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥१॥
तैसी अधमाची जातीच अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥
न कळे विंचासी कुरवाळिलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥२॥
तुका म्हणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥३॥
अर्थ
कडू वृंदावनात कितीही गुळात माखले आणि काळे जिऱ्यावर कितीही साखर टाकली तर त्याचा काही उपयोग होणार आहे काय त्याचा कडूपणा जाणार आहे काय? त्याप्रमाणे अधम लोकांची जातच अधम असते ते नीचच असतात त्यांना कितीही उपदेश केला तरी तो श्रमच होतो. विंचवाला प्रेमाने कुरवाळले तरी त्याला कळत नाही की आपल्याला या माणसाने प्रेमाने कुरवाळले आहे त्याला हात लावला की तो लगेच नांगी मारण्याचा आपला मूळ रंग दाखवतोच. तुकाराम महाराज म्हणतात दगडाला कधीही शिजवले जात नाही आणि जशी सुकराला विष्टा गोड लागते त्याप्रमाणे अधम मनुष्य असतात ते दगडाप्रमाणे व सुकराप्रमाणे आहेत त्यांना कितीही चांगला उपदेश करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यांना आवडत नाही.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
