नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५९७
किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस झालेती ॥१॥
माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळी ॥ध्रु.॥
कांहीं न मागतां भलें । होईल तेचि काम केलें । नसावें आथिलें । कांहीं एका संकल्पें ॥२॥
तुका म्हणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥३॥
अर्थ
अरे तुम्ही एकमेकांना शिवी घालून किती दीनवाणे होताल? आणि तुम्ही संसाराच्या बिळात पडून किती कासावीस झाला आहात. त्यापेक्षा तुम्ही माझ्या स्वामीला म्हणजे कृपाळू पांडुरंगाला शरण जावे. तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो नेहमी तुम्हाला त्याच्या जवळच ठेवील. तुम्ही त्याला काहीही न मागितलेलेच बरे तुम्ही काही मागितले नाही तर तुमचे काम होतील. तुम्ही त्याला एकनिष्ठेने शरण जावे परंतु शरण जाताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचे मागणे किंवा संकल्प नसावा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही तुमचा एकनिष्ठ भक्ती भाव पांडुरंगाच्या ठिकाणी ठेवला, आणि तुम्ही तुमची सेवा त्या पांडुरंगाच्या ठिकाणी ठेवली तर तो तुम्हाला त्याच्या पासून वेगळे होऊ देणार नाही.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
