२५९५, अभंग :- आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२५९५
आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शकेचि ना ॥१॥
जाणें माउली त्या खुणा । क्षोभ उपजों नेंदी मना । शांतवूनि स्तना । लावीं अहो कृपाळे ॥ध्रु.॥
तुज अवघे होऊं येते । परी मज वाटों नये चित्ते । उपासने परतें । नये कांहीं आवडों ॥२॥
करूं रूपाची कल्पना । मुखीं नाम नारायणा । तुका म्हणे जना । जनस्थळ देखतां ॥३॥

अर्थ

हे श्रीपती तुमच्याविषयी एकनिष्ठता राहावी हीच आम्हा भाविकांची जात आहे. अहो श्रीपती आम्हाला तुम्ही कितीही श्रीमंतीचा भोग मोक्ष इत्यादी अलंकार देण्याची युक्ती केली तरी आम्हाला तुमच्याविषयी जी एकनिष्ठ भक्त आहे ती आम्ही विसरू शकत नाही.माऊली आपल्या मुलाच्या सर्व खुणा जाणत असते त्याला केव्हाही दुःख होऊ देत नाही. त्याप्रमाणे हे कृपाळूआ ती आई मुलगा रडायला लागले तर त्याला स्तनाला लाऊन शांत करते तसेच तुम्ही तुमच्या प्रेमरूपी स्तनाला मला लावून मला शांत करा. तुला सर्व काही होता येते परंतु अनेक रूपे घेऊन तू माझ्या चित्ताला विभागू नये.मला तुझी उपासना करणे हेच एक आवडते दुसरे काहीही आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही सर्वत्र तुझ्याच रूपाची कल्पना करू आणि मुखाने नारायण असे नाम घेऊ.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही लोकांमध्ये पाण्यामध्ये व ठिकाणांमध्ये तुझेच रुप पाहू.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading