नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५७६
आम्हां सकळा हें । तुझ्या नामाचेंचि बळ ॥१॥
करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥
जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥२॥
तुका म्हणे देवा । तुझे पायीं माझा हेवा ॥३॥
अर्थ
हे देवा, हे पांडुरंगा आमच्यासारख्या हरिभक्तांकडे फक्त आणि फक्त तुझ्या नामाचेच काय ते बळ आहे, अन्य आमच्याकडे विसंबण्यासारखे काहीही नाही, सतत तुझ्या अमृतरूपी नामाचे सेवन करणे एवढेच काय ते आम्ही जाणतो, अन्य आम्हांस काहीही माहित नाही. ह्या व्यतिरिक्त ज्याचा ज्याचा जो काही भोग आहे ते तो सुख, दुःख पीडा आणि रोग रूपाने भोगतच असतो म्हणेजच शरीर हे प्रारब्धानुसार त्याचे त्याचे भोग भोगतच राहणार, त्याच्या वाट्याला येणारे सुख दुःख त्याला घेत राहावे लागणार. तुकाराम महाराज म्हणतात परंतु मला मात्र तुझ्या पायांची ओढ लागली आहे, माझ्या मनाने त्याचा ध्यास घेतला आहे, त्यापायी माझा हेवा वाढतच चालला आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
