नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५७५
आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ॥१॥
तूं वो माझी सखी येसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ध्रु.॥
काया वाचा मनें हेंचि आस करीं । पाउलें गोजिरीं चिंतीतसें ॥२॥
तुका म्हणे माझी पुरवीं हे आस । घालीं ब्रम्हरस भोजन हें ॥३॥
अर्थ
अर्थ:–हे देवा आता तुझ्याशिवाय मी कोणास काकुळतीस येऊ, कोणास शरण जाऊ कारण अंतकाळात माझ्या मदतीला तुझ्याखेरीज कोण धावून येईल, माझ्या शेवटच्या क्षणी माझी कोण सोडवणूक करेल?हे पांडुरंगा तू माझी सखी आहेस, माझी जिवाभावाची मैत्रीण आहेस, तू लवकर माझ्या हाकेला धावून ये, मी तुझी वाट पाहत आहे. माझे मन काया वाचा सकट तुझ्या पाउलांची आस लावून बसले आहेत, तुझ्या गोजिऱ्या पायांचे सतत ते चिंतन करत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा, हे विठ्ठला कृपा करून माझी ही आस, माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करावीत व माझ्या मुखी ब्रम्हरस रुपी भोजन घालून मला धन्य करावेत.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
