नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५२२
तीर्थाचिये आसे । पंथ तो निदैव । पाविजेतो ठाव अंतराय ॥१॥
म्हणऊनि भलें निश्चळचि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥ध्रु.॥
संकल्पारूढ तें पराधीन जिणें । कार्यचि कारणें वाढतसे ॥२॥
तुका म्हणे कामा नाहीं एक मुख । जिरवितां सुख होतें पोटीं ॥३॥
अर्थ
जे नेहमी तीर्थयात्रेच्या मार्गाने चालत असतात ते दुर्दैवी असतात कारण तो नेहमी बहिरमुख असतो व हरिची प्राप्ती करून घेण्यासाठी तो अंतरत असतो.त्यामुळेच मनाची जी आत्मस्थिती आहे त्या ठिकाणी निश्चल होऊन बसणे हेच योग्य व चांगले.जे नेहमी संकल्प करत असतात त्यांचे जगणे हे संकल्पाच्या आधीन असते त्यामुळे त्यांचे जगणे पराधीन असते आणि संकल्प केलेले कार्य पूर्ण करण्यातच ते गुंतून राहून कार्यनेच कार्य वाढत असते. तुकाराम महाराज म्हणतात इच्छेला एक तोंड नसते अनेक तोंड असतात त्यामुळे ते जिरून टाकावे व असे केल्याने आपल्या पोटी आत्मसुख निर्माण होते.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
