२५१४, अभंग :- दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें:- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२५१४
दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥
समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥
काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडिलें अंतर न पाहिजे ॥२॥
तुका म्हणे यश कीर्ती आणि मान । करितां जतन देव जोडे ॥३॥

अर्थ
शरण आलेल्या शत्रूने मान जरी कापण्यास दिले तरी राजाने ती कापू नये कारण शरण आलेल्या जीवाचे रक्षण आपल्या जीवावर उदार होऊन देखील करावे लागते.कारण समर्थ राजाला कोणतेही कार्य करताना विचार करण्याची शपथ घ्यावी लागते आणि चांगल्या माणसांना कोणतेही कार्य करताना पाप-पुण्याचा विचार करावा लागतो. कोणी पापी माणूस आपल्याला काकुळतीला जरी आला तरी त्याच्यासाठी सत्याचा विसर पडू देऊ नये योग्य तो निर्णय घ्यावा आणि तो आपल्याला शरण आला आहे त्याला देखील योग्य तो न्याय मिळावा यात देखील अंतर पडू देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात योग्य रीतीनेच कीर्ती आणि मान मिळावे संपादन करावे व त्याचे रक्षण करावे त्या योगानेच त्या समर्थ व्यक्तीला देवाची प्राप्ती होते.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *