२५१३, अभंग :- न पालटे जाती जीवाचिये साठी । वाहे तेचि पोटीं दावी वरी:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२५१३
न पालटे जाती जीवाचिये साठी । वाहे तेचि पोटीं दावी वरी ॥१॥
अंतरीं सबाहीं सारिखाचि रंग । वीट आणि भंग नाहीं रसा ॥ध्रु.॥
घणाचिया घायें पोटीं शिरे हिरा । सांडूं नेणे धीरा आपुलिया ॥२॥
तुका म्हणे कढे करावी शीतळ । ऐसें जातिबळ चंदनाचें ॥३॥

अर्थ
जे खरे जातिवंत लोक असतात चांगल्या गुणांनी युक्त जे असतात ते कधीही आपल्या शब्दावर पलटत नाहीत जे त्यांच्या अंतकरणात असते तेच ते वरही दाखवीत असतात. अशा माणसांच्या आत आणि बाहेर एकच रंग असतो त्यांचा तो चांगला रंग कधीही विटत नाही आणि भंगतही नाही. हिरा कितीही घणाचा घाव बसला तरी एक वेळेस ऐरणेत शिरतो परंतु आपला जो रंग आहे गुण आहे म्हणजे न भंगण्याचा तो कधीही सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात कितीही कढलेले उकळलेले तेल असो परंतु चंदन ही जात अशी असते की ते उकळलेल्या तेलाला देखील शीतळ करते असे बळ चंदना मध्ये असते.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading