नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५०८
समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामुग्री ते सर्व सिद्ध घरीं ॥१॥
आदराचे ठायीं बहुच आदर । मागितलें फार ते ते वाढी ॥ध्रु.॥
न म्हणे सुह्रद सोयरा आवश्यक । राजा आणि रंक सारिखेचि ॥३॥
भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळेची ॥३॥
कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥४॥
तुका म्हणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवा ॥५॥
अर्थ
जो खरोखर समर्थ असतो श्रीमंत ऊदार असतो त्याच्या घरी उच्च, नीच असा भेद नसतो आणि त्याच्या घरी सर्व प्रकारच्या सामग्री सज्ज असतात. घरी जेवणासाठी कोणीही येऊ तो भेद करत नाही आलेल्या सर्व आदरणीय व्यक्तींचा तो खूपच आदर करतो आणि ते जे जे मागतील ते त्यांना आग्रह करून वाढतो. घरी जेवण करण्यास आलेले व्यक्ती हा माझा प्रेमळ आहे किंवा हा माझा सोयरा आहे असे तो केव्हाही म्हणत नाही वाढताना सर्वांना सारखेच प्रमाण धरून वाढतो राजा आणि रंक त्याला दोन्ही सारखेच असतात. ज्यांच्याजवळ खरा भक्ती भाव आहे त्यांच्याजवळ तो लडबड करतो आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने तो वागवीत असतो. घरी आलेला अतिथीमध्ये कोणालाही तो समर्थ व्यक्ती विसरत नाही आणि सर्वांना विनंती करून त्यांना देव समजून त्यांच्या सर्व शंका दूर करतो. तुकाराम महाराज म्हणतात त्या समर्थाच्या घरी सर्वांचे पोट भरून अन्न उरते असा अनुभव लोकांना येतो.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
