नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २२०६
मेघवृष्टीने करावा उपदेश परि गुरुने न करावा शिष्य । वाटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥
द्रव्य वेचावे अन्नछत्री । भूती द्यावे सर्वत्र । न घ्यावा हा पुत्र ।उत्तमयाती पोसना ॥धृपद॥
बीज न पेरावे खडकी ।ओल नाही ज्याचे बुडखी । थीता ठके सेखी ।पाठी लागे दिवाण ॥२॥
गुज बोलावे संतांशी ।पत्नी राखावी जैसी दासी । लाड देता तियेसी वाटा पावे कर्माचा ॥३॥
शुद्ध कसूनिपाहावे वरी रंगा न भुलावे । तुका म्हणे घ्यावे जया नये तुटी ते ॥४॥
अर्थ
एखाद्या ज्ञानी व्यक्तीने मेघ वृष्टी प्रमाणे उपदेश करावा परंतु गुरूने कधीही शिष्य करू नये. कारण शिष्यांनी कोणतेही पुण्याचे किंवा पापाचे कर्म करू त्याचा अर्धा वाटा गुरूला लाभत असतो. अधिक धनवान असेल तर त्या मनुष्याने द्रव्य म्हणजे धन एखादया अन्नछत्रा सारख्या ठिकाणी अर्पण करावे सर्व भूतमात्रांना अन्न खाण्यास द्यावे. आपण जर निपुत्रिक आहात तर एवढ्या मोठ्या धनाला वारसदार कोण असे समजून एखाद्या उत्तम जातीच्या मुलाला देखील दत्तक घेऊ नये. खडकाच्या ठिकाणी आणि जेथे ओलावा राहत नाही त्याच्या बुडखाला बीज पेरू नये. कारण अशा प्रकारची शेती शेवटी काहीच फळ देत नाही शेती करण्यासाठी ज्या दिवाना कडून ऋण घेतलेले असते तो दिवान शेवटी त्या ऋणाची फेडणी करण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागतो. गुज काही असेल तर ते संतांजवळ बोलावे आणि जशी दासी असते त्याप्रमाणे पत्नी ला राखावे. परंतु तिला जर लाड दिला तर, तिने केलेल्या कर्माचा अर्धा वाटा तिच्या पतीला प्राप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला कोणती गोष्ट आवडली तर ती पूर्णपणे शुद्ध कसू�
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
