२०४६, अभंग :- जालो निर्भर मानसी । म्हणऊनि कळलासी:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. २०४६
जालो निर्भर मानसी । म्हणऊनि कळलासी ॥१॥
तुझे म्हणविती त्यास । भय चिंता नाही आस ॥धृपद॥
चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥२॥
तुझे जाणोनिया वर्म । कंठी धरियेले नाम ॥३॥
तुका म्हणे तेणे सुखे । निरसली जन्मदुःखे ॥४॥

अर्थ

देवा आम्ही मनापासून निर्भर(आनंदभरीत) झालो म्हणजे आमच्या मनाला तुझे खरे ज्ञान झाले. देवा जे भक्त स्वतःला तुझा म्हणून घेतात त्यांना कोणत्याही प्रकारची इच्छा भय चिंता नसतेच. देवा जे स्वतःला तुझा म्हणून घेतात त्यांचा तु सर्व पाश नाहीसा करतो त्यांचे गर्भवास यातना तुच चुकवीत असतोस. देवा तुझी प्राप्ती कश्याने होईल ते वर्म आम्ही जाणले आहे ते वर्म म्हणजे तुझे नाम आहे म्हणूनच तेच नाम आम्ही आमच्या कंठात धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला तुझे ज्ञान व तुझे नाम यामुळे जे सुख प्राप्त झाले त्यामुळे जन्ममरणाचे दुःखच आमचे नीरसले आहे.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading