नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २०३४
आवडीचे दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे॥१॥
जे जया रुचे ते करी समोर । सर्वज्ञ उदार मायबाप ॥धृपद॥
ठायी पडिलिया ते चि लागे खावे । ठायीचे चि घ्यावे विचारूनि ॥२॥
बीज पेरूनिया ते चि घ्यावे फळ । डोरलीस केळ कैचे लागे ॥३॥
तुका म्हणे देवा काही बोल नाही । तुझा तू चि पाही शत्रु सखा ॥४॥
अर्थ
भक्तांच्या आवडीचे दान नारायण भक्तांना देत असतो त्याकरता तर तो आपले दोन्ही हात उभारून विटेवर उभा राहिला आहे. ज्या भक्ताला ज्याची आवड असेल त्याच्या समोर ते तो सादर करत असतो असा हा सर्वज्ञ उदार आमचा माय बाप आहे. आपल्या ताटात आपण जे मागू तेच देतो व ते आपल्याला खावे लागते त्याकरता काहीही मागतांना विचार करून मागावे म्हणजेच देवाला कोणतेही दान मागताना विचार करून मागावे नंतर पश्चाताप करत बसू नये. जसे बीज आपण पेरतो तसेच फळ आपल्याला घ्यावे लागते जर रान वांग्याचे झाड लावले तर त्याला चांगले फळ कसे येतील ते सांगा? तुकाराम महाराज म्हणतात अहो तुम्ही देवाला दोष का बर देता बारीक विचार करून पाहिले तर असे लक्षात येते की चांगला विचार आपण केला तर आपण आपले मित्र आहोत आणि वाईट विचार केला तर आपणच आपले शत्रु आहोत.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
