१९५०, अभंग :- दुबळे सदैवा । म्हणे नागवेल केव्हा:- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. १९५०
दुबळे सदैवा । म्हणे नागवेल केव्हा ॥१॥
आपणासारिखे त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥धृपद॥
मूढ सभे आत । इच्छी पंडिताचा घात ॥२॥
गांढे देखुनि शूर । उगीच करि बुरबुर ॥३॥
आणिकाचा हेवा । न करी शरण जाई देवा ॥४॥
तुका म्हणे किती । करू दुष्टाची फजिती ॥५॥

अर्थ

दुबळा आणि विचाराणे दुष्ट असलेला मनुष्य एखादा भाग्यवान मनुष्य पाहिला की मनात म्हणतो, याचे केव्हा वाटोळे होईल हा केव्हा नागवला जाईल याची केव्हा फजिती होईल? त्या भाग्यवान मनुष्याला तो दुष्ट मनुष्य आपल्यासारखाच मनातल्या मनात करू पाहतो. मग अशा माणसाच्या स्वभावाला कोण काय करणार आहे? मूढ मनुष्य भर सभेमध्ये पंडिताचा घात किंवा त्याचा अपमान केव्हा होईल याची वाट पाहत असतो. भित्रा मनुष्य शुर शिपायाला पाहून उगीचच मनामध्ये काहीतरी कुरकुर करीत असतो. दुष्ट मनुष्याने इतरांचा हेवा करण्यात काय अर्थ आहे काय त्याला मी असा उद्देश करेन की तु वेगाने देवाला शरण जा म्हणजेच चांगले होईल. तुकाराम महाराज म्हणतात अशा दुष्ट लोकांची मी किती वेळा फजिती करू?

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

Leave a Reply