नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १९४९
निंबाचिया झाडा साकरेचे आळे । आपुली ती फळे न संडीच ॥१॥
तैसे अधमाचे अमंगळ चित्त । वमन ते हित करुनि सांडा ॥धृपद॥
परिसाचे अंगी लाविले खापर । पालट अंतर नेघे त्याचे ॥२॥
तुका म्हणे वेळू चंदना संगती । काय ते असती जवळिके ॥३॥
अर्थ
कडू लिंबाच्या झाडाला साखरेचे आळे करून त्यामध्ये पाणी सोडले तरी कडुलिंबाचे फळे गोड होणार नाहीत ती आपली गुणधर्म सोडणार नाहीत कडुलिंबाची फळे जरी साखरेचे आळे केले तरी कडूच राहणार. त्याप्रमाणे अधम व्यक्तीचे चित्त अमंगळ असते त्याला कितीही चांगल्या व हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी जसे जेवण केलेले अन्न ओकावे त्याप्रमाणे चांगले सांगितलेले सर्व तो आपल्या बुद्धीतून ओकुन टाकत असतो. परिसाच्या अंगाला खापर लावले असता त्याचे सोन्यामध्ये रूपातर होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात वेळूच्या वनांमध्ये जरी चंदनाची झाडे असले तरी त्याचा काही उपयोग?
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
