१८५९, अभंग :- जतन करा रे जतन करा । घालू पाहे घरावरी घाला:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. १८५९
जतन करा रे जतन करा । घालू पाहे घरावरी घाला चोरटे ॥१॥
अवघेचि निजो नका अवघिये ठायी । वेळ अवेळ तरी सांभाळावी काही ॥धृपद॥
सीतरिली फार खाती भोवताले फेरे । गेले नये हाता सेकी तळमळ उरे ॥२॥
तुका म्हणे आह्मी करू आपले जतन । न लगे काही कोणा घावे उघडारे कान ॥३॥

अर्थ

लोकहो , परमार्थरूपी धनाचे रक्षण करा. कारण , देहरूपी घरावर काळरूपी चोरटे घाला घालू पाहात आहे. तुम्ही सर्वजण सर्वकाळ निजू नका. वेळ – अवेळ काहीतरी बघत जा ;व प्रसंगी विशेषी सावध राहा. मायिक विषयांनी ठकविलेली माणसे अनेक योनींच्या भोवती मरणाचे फेरे घालतात. मनुष्य देहरूपी निधान एकदा का गेले ;म्हणजे पुनः ते हाताशी येत नाही , व शेवटी तळमळ करणे तेवढे उरते. तुकाराम महाराज म्हणतात , आम्ही आपले परमार्थ धन जतन करू. या परमार्थ धनाचे रक्षण करण्याकरिता कोण्या रखवालदार शिपायाला पगार द्यावा लागत नाही. लोकहो , तुम्हीदेखील माझा हा उपदेश कान उघडे ठेवून ऐका. व परमार्थ धनाचे रक्षण करा.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading