नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १८६०
काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हिते जाले जनामध्ये शूर ॥१॥
का रे तुह्मी नेणा का रे तुह्मी नेणा । अल्प सुखासाठी पडशी विपत्तीचे घाणा ॥धृपद॥
नाही ऐसी लाज काय तयापे आगळे । काय नव्हे केले आपुलिया बळे ॥२॥
तुका म्हणे तरी सुख अवघेचि बरे । जतन करून हे आपुलाली ढोरे ॥३॥
अर्थ
अर्थ:–ज्या संतांनी साधकावस्थेत असताना मोठ्या धैर्याने परमार्थासंबंधी अनेक युक्त्या लढवून हरीविषयी अज्ञान दूर केले ;व आपले हित साधले , ते संत या जनामध्ये मोठे शूर झाले आहेत. लोकहो , हे तुमच्या लक्षात का येत नाही ? विषयाच्या अल्प सुखासाठी अनेक विपत्तींच्या घाण्यात निष्कारण का पडता ? संतांप्रमाणे तुम्हीदेखील परमार्थाचा पक्ष घेऊन व अज्ञान नष्ट करून हित साधा. परमार्थ करण्याकरिता तुमच्यापेक्षा संतांमध्ये कोणता विशेष गुण होता ;आणि तुमच्यात त्यांच्यापेक्षा कोणती न्यूनता आहे. सांगा ! दोघानाही मनुष्यदेह तर सारखाच आहे , मग संतांनी मुक्त होऊन सुखी व्हावे ;आणि तुम्ही मात्र मनुष्यदेह असून बध्द दुःखी राहावे , याची तुम्हाला लाज वाटू नये काय ? अरे , आपल्या प्रयत्नबळाने केले तर काय एक होत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात , लोकहो , संतांप्रमाणे तुम्ही परमार्थ केला , तर तुमचे सर्वतोपरी कल्याण होऊन सुखप्राप्ती होईल ; पण त्याकरिता प्रथम इंद्रियरूपी पशूंचे रक्षण करा.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA