नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १८५४
डोळिया पाझर कंठ माझा दाटे । येऊ देई भेटे पांडुरंगे ॥१॥
बहु दिस टाकिले का निरास केले । कोठे वो गुंतले चित्त तुझे ॥धृपद॥
बहु धंदा तुज नाही वो आठव । राहिलासे जीव माझा कंठी ॥२॥
पंढरीस जाती वारकरी संता । निरोप बहुता हाती धाडी ॥३॥
तुजविण कोण सांवा धावा करी । ये वो झडकरी पांडुरंगे ॥४॥
काय तुझी वाट पाहो कोठवरी । कृपाळु कापरी विसरलासी ॥५॥
एक वेळे माझा धरूनि आठव । तुका म्हणे ये वो न्यावयासी ॥६॥
अर्थ
हे पांडुरंगा तुझ्या वियोगाणे आता माझ्या डोळ्यांना पाझर फुटला आहे माझा कंठ दाटून आला आहे त्यामुळे लवकर यावे आणि मला भेट द्यावी. देवा तू माझा त्याग करून बरेच दिवस झाले आहेत माझी निराशा केली आहेस माझ्यापासून तुझे चित्त इतर कोणत्या कामात गुंतले आहे की काय? देवा मला माहित आहे तुझ्या पाठीमागे खूप उद्योग धंदा आहे त्यामुळे तुला माझी आठवण येत नाही परंतु तुझ्या वियोगाने माझा जीव कंठात आला आहे. मी पंढरपूरला जे वारकरी संत जातात त्यांच्या कडे खूप वेळा माझा निरोप पाठवला आहे. हे पांडुरंगा तुझ्या वाचुन कोण मला सहाय्य करेल त्यामुळे हे पांडुरंगा तु लवकर धावत माझ्याकडे यावे. हे कृपाळू देवा मी तुझी वाट कुठपर्यंत पाहू तू मला विसरला आहेस की काय? तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तु एकदा तरी माझी आठवण काढ आणि मला तु घ्यायला ये.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA