नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १८५३
कृष्ण ध्याता चित्ती कृष्ण गाता गीती । ते ही कृष्ण होती कृष्णध्याने ॥१॥
आसनी शयनी भोजनी जेविता । म्हणारे भोगिता नारायण ॥धृपद॥
ओविया दळणी गावा नारायण । कांडिता कांडण करिता काम ॥२॥
नर नारी याति हो कोणी भलती । भावे एका प्रीती नारायणा ॥३॥
तुका म्हणे एका भावे भजा हरी । कांति ते दुसरी रूप एक ॥४॥
अर्थ
जो कृष्णा चे ध्यान करतो जो कृष्णाचे गीत गातो, तो ध्यान करणारा आणि गीत गाणारा कृष्णासारखा होतो. त्यामुळे हे जण हो तुम्ही झोपलेले असताना बसलेले असताना जेवण जेवत असताना एवढेच नाही तर कोणतेही भोग भोगत असताना नारायण नारायण म्हणत रहा. हे स्त्रियांनो तुम्ही देखील दळण दळत असताना कांडण करीत असताना आणि कोणतेही काम करत असताना नारायणाच्याच ओव्या गात रहा. कोणत्याही जातीचा पुरुष असो किवा स्त्री असो त्या सर्वांनी एकनिष्ठ भक्ती भावाने नारायणाचे गुणगान ऐकावे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एकनिष्ठेने हरीला भजा, जसे सूर्य आणि त्याची कांती ही वेगवेगळी असते परंतु दोघाचे ही रूप एकच असते तसे तुमचे व हरीचे एकरूप होईल.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA