नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १८०५
देवाचा भक्त तो देवासी गोड । आणिकासी चाड नाही त्याची ।
कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघिया हाती अंतरला ॥१॥
निष्काम वेडे म्हणतील बापुडे । अवघिया साकडे जाला कैसा ।
माझे ऐसे तया न म्हणत कोणी । असे रानी वनी भलते ठायी ॥धृपद॥
प्रातःस्नान करी विभूतिचर्चन । दखोनिया जन निंदा करी ।
कंठी तुळसीमाळा बैसोनि निराळा । म्हणती या चांडाळा काय जाले ॥२॥
गाता शंका नाही बैसे भलते ठायी । शिव्या देती आई बाप भाऊ ।
घरी बाइल म्हणे कोठे व्याली रांड । बरे होते शंड मरता तरी ॥३॥
जन्मोनि जाला अवघिया वेगळा । म्हणोनि गोपाळा दुर्लभ तो ।
तुका म्हणे जो संसारा रुसला । तेणेचि ठाकिला सिद्धपंथ ॥४॥
अर्थ
जो देवाचा खरा भक्त आहे जो देवाशी एकरूप आहे त्याच भक्ताची देवाला आवड आहे देवाला इतरांची देवाला आवड नाही. कारण तो भक्त कोणाचाही सोयरा किंवा सांगाती म्हणजे सोबती नसतो तो सर्वांत पासूनच अंतरलेला असतो. तो भक्त वेडा आहे, निष्काम आहे, बापुडा आहे असे लोक म्हणत असतात आणि याच्या पासून आम्हाला संकट आहे असे देखील लोक म्हणतात. तो भक्त रानावनात कोठेही राहत असला तरी हा माझा कोणी नातेवाईक किंवा कोणी सखा सोबती आहे असेदेखील त्याच्याविषयी कोणीही म्हणत नाही. तो प्रातःकाळी स्नान करून अंगाला विभूती लावतो भस्म लावतो आणि हे पाहून सर्व लोक त्याची निंदा करतात. तो कंठा मध्ये तुळशी माळ घालून सर्वांपासून वेगळा बसलेला असतो तरीदेखील लोक म्हणतात की या चांडळाला नेमके काय झाले आहे? तो कोठे असला की हरीचे गीत गाताना त्याला भान राहत नाही व तो हरीचे गीत गाणं चालू करतो आणि ते पाहून त्याचे आई, बाप, भाऊ त्याला �
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA