नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२४१९
देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥१॥
भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥
देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥२॥
एका अंगीं दोन्ही झालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥३॥
तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥४॥
अर्थ
देवाचा अवतार असतो तर भक्तांचा जन्म म्हणजे संसार असतो परंतु दोघांचाही विचार एकच असतो. देवाच्या अंगसंगतीला राहून भक्त सुखसोहळे भोगतात आणि देव भक्तांच्या संगतीत राहून सुख सोहळे भोगतात.देवांनी भक्तांना मनुष्य देह आणि भक्तांनी देवाला नामरूप व आकार दिलेला असतो व भक्त त्याच्या भक्तीचा अपार महिमा संपूर्ण जगभर करत असतात. एकच ब्रह्मापासून देव आणि भक्त हे दोघे निर्माण झालेले असतात स्वामी आणि भक्त सेवक म्हणून वावरतात आणि भक्त स्वामी ची सेवा करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात देव आणि भक्त यामध्ये कोणत्याही प्रकारचा भिन्न भाव नाही भक्त तोच देव आणि देव तोच भक्त आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
