नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ८८०
कोण पुण्ये यांचा होईन सेवक । जीही द्वंदादिक दुराविले ॥१॥
ऐसे वर्म मज दावी नारायणा । अंतरीच्या खुणा प्रकटोनि ॥धृपद॥
बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥२॥
तुका म्हणे मग नये वृत्तीवरी । सुखाचे शेजारी पहुडईन ॥३॥
अर्थ
कोणत्या पुण्याईने मी जे संत महात्मे सुख व दुख यांचा त्याग केल्यावर त्यांचा मी सेवक होईल? हे नारायणा मला ते वर्म सांग कि ज्या मुळे माझ्या अंतःकरणातील गुह्य ज्ञान प्रकट करून संतांची भेट होईल. हे हरी अश्या संताची भेट होणे खूप अवघड आहे म्हणून मी तुम्हाला हि करुणा केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात या संतांचीची मला जर भेट घडली तर मी वृत्तीहीन होईल आणि मी जे अखंड सुख आहे त्या चिद आनंदा जवळ वीरज मान होईल किंवा त्या जवळ मी राहीन.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
