नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 308
द्रव्य असता धर्म न करी । नागविला राजद्वारी ॥१॥
माय त्यासि व्याली जेव्हा । रांड सटवी नव्हती तेव्हा ॥धृपद॥
कथाकाळी निद्रा लागे । कामी श्वानापरी जागे ॥२॥
भोग स्त्रियेसि देता लाजे । वस्त्र दासीचे घेउनि निजे ॥३॥
तुका म्हणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥४॥
अर्थ
आपल्याजवळ ज्यावेळी पैसे असतात त्यावेळी जो कोणत्याही प्रकारचे दानधर्म करीत नाही त्या मनुष्यास नंतर न्यायालयात राजदरबारात उभे केल्यास दंडास पात्र करून त्याला दंड केला जातो. त्याच्या आईने त्याला जेव्हा जन्म दिला त्यावेळेस सटवी तेथे नव्हती काय? बहुतेक त्यामुळेच तो जगला असावा. हरिकथा चालू असताना त्याला झोप लागते पण स्त्रीसंग करताना जसा कुत्रा कुत्रीचा मागे रात्रभर लागतो तसा त्या वेळी रात्री तो कामातुर होऊन, त्याला झोप येत नाही. या अशा मनुष्याने आपल्या धर्मपत्नीला एखादे लुगडे जरी घेऊन द्यायचे म्हटले तरी तो घ्यायचा नाही पण दासीचे वस्त्र उराशी घेऊन झोपतो. तुकाराम महाराज म्हणतात असे मनुष्य गाढवा पेक्षाही नीच आहेत असे समजावे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
