११५०, अभंग :- माझिया मीपणावरी पडो पाषाण । जळो हे भूषण नाम माझे :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. ११५०
माझिया मीपणावरी पडो पाषाण । जळो हे भूषण नाम माझे ।
पापा नाही पार दुःखाचे डोंगर । जालो ये भूमीसी ओझे ॥१॥
काय विटंबना सांगो किती । पाषाण फुटती ऐसे दुःख ।
नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती डोळा माझे मुख ॥धृपद॥
काया वाचा मने अघटित करणे । चर्मचक्षु हात पाय ।
निंदा द्वेष घात विश्वासी व्यभिचार । आणीक सांगो किती काय ॥२॥
लक्ष्मीमदे माते घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद ।
पितृवचन घडली अवज्ञा अविचार । कुटिल कुचरवादी निंद्य ॥३॥
आणीक किती सांगो ते अवगुण । न वळे जिव्हा कापे मन ।
भुतदया उपकार नाही शब्दा धीर । विषयी लंपट शब्द हीन ॥४॥
संत महानुभाव ऐका हे उत्तरे । अवगुण अविचार वृद्धि पापा ।
तुका म्हणे सरते करा पांडुरंगी । शरण आलो मायबापा ॥५॥

अर्थ
माझ्या “मी(अहंकार)” पणावर दगड पडो आणि जगात माझे जे नाम झाले , माझे जे भूषण झाले आहे त्याला आग लागो. माझ्या पापाला पारावार नाही त्यामुळे मी अनेक दुःखाचे डोंगर भोगत आहे. मी भूमीला भार झालो आहे माझी काय फजिती होत आहे हे मी किती सांगू. माझे दुखने ऐकून दगडही फुटेल. स्त्री-पुरुष , उत्तम वर्णातील लोक, चांडाळ हे सर्वजण डोळ्याने माझे मुख देखील पाहत नाहीत. माझ्या काया, वाचा , मनाने , चक्षूने , हाताने , पायाने निंदा, द्वेष , घात , दुसऱ्यांचा विश्वास तोडणे , व्याभिचार असे अनेक अनहित कर्म केलेले आहेत माझ्या हातून वाईट कर्मे घडलेली आहेत आता ते मी कसे सांगू ? संपत्तीच्या मदाने माझ्या हाताने अनेक महापाप घडले मी दोन पत्नीमध्ये भेद करत होतो. पितृवचनाची मी अवज्ञा केली असा मी अविचारी , कुटील कुच्चर , भांडखोर आहे. मी आता माझे किती अवगुण तुम्हाला सांगू ते सांगण्याकरिता देखील जीभ वळत नाही. मन थरथर कापते. मी कधीही भूतदया केली नाही कोणावर कधीही उपकार केले नाही. माझ्या शब्दांना धीर नाही स्थैर्य नाही. मी विषय लंपट आहे माझ्याकडे आता बोलण्यासाठी शब्दच नाही. तुकाराम महाराज म्हणतात संत महानुभव तुम्ही माझे बोलणे ऐका मला तुम्ही पांडुरंगाच्या पायापाशी सरते करा माझे अवगुण अविचार वाढले आहे मग पांडुरंग माझा स्वीकार करील कसा याविषयी विचार करा मला सांगा हे मायबाप हो मी तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर येवढा उपकार करा मला तुम्ही पांडुरंगाच्या पायापाशी सरते करा.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

Leave a Reply