११४९, अभंग :- काय नाही माता गौरवीत बाळा । काय नाही लळा पाळीत ते :- संत तुकाराम सार्थ गाथा

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. ११४९
काय नाही माता गौरवीत बाळा । काय नाही लळा पाळीत ते ॥१॥
काय नाही त्याची करीत ते सेवा । काय नाही जीवा गोमटे ते ॥धृपद॥
अमंगळपणे कांटाळा न धरी । उचलोनि करी कंठी लावी ॥२॥
लेववी आपुले अंगे अळंकार । संतोषाये फार देखोनिया ॥३॥
तुका म्हणे स्तुति योग्य नाही परी । तुम्हा लाज थोरी अंकिताची ॥४॥

अर्थ
माता आपल्या बाळाचा गौरव करत नाही काय, आणि त्याचा लळा ती पूर्ण करीत नाही काय? माता तिच्या बाळाची सेवा करत नाही काय , आणि सेवा केल्याने तिला बरे वाटत नाही काय ? ते बाळ अमंगळ जरी असले किंवा दिसण्यास कसेही असले तरी त्या मातेला त्याचा कंटाळा येतो काय ती त्याचा कंटाळा कधीही धरत नाही, उलट त्या बाळाला उचलून कंठाशी लावते किंवा त्याला मिठी देते. ती माता बालकाला अलंकार परिधान करते आणि त्या बालकाला पाहून मातेलाच संतोष होतो तिला खूप आनंद होतो. तुकाराम महाराज म्हणतात हे संत जन हो तुम्ही माझी स्तुती करणे योग्य नाही परंतु तुम्हाला माझा अभिमान असल्यामुळे तुम्ही माझी स्तुती करतात जशी आई आपल्या मुलाचा अभिमानाने गौरव करते अगदी त्याप्रमाणेच.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

Leave a Reply