११४२, अभंग :- कासया पाषाण पूजितसा पितळ । अष्ट धातु खळ भावे विण :- संत तुकाराम सार्थ गाथा

पूजा काय नसतांना के तर फळ देत नाही ?

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. ११४२
कासया पाषाण पूजितसा पितळ । अष्ट धातु खळ भावे विण ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । मोक्षाचे साधन बोलियेले ॥धृपद॥
काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळा विषयजप ॥२॥
काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥३॥
काय करिशील कुशल गायन । अंतरी मळीण कुबुद्धि ते ॥४॥
तुका म्हणे भाव नाही करीसी सेवा । तेणे काय देवा योग्य होशी ॥५॥

अर्थ
अरे वेड्या जर तुझ्या मनात हरी विषय खरा भक्तिभाव नसेल तर मग तू पाषाणाच्या , पितळाच्या व अष्टधातू च्या मूर्तींची पूजा का करतोस? अरे हरी प्राप्ती करून घ्यायची असेल तर मनामध्ये शुद्ध भक्तिभाव पाहिजे आणि शुद्ध भक्तिभाव हेच मोक्षाचे साधन आहे असे उपनिषद व भाद्गवतगीतेत सांगितले आहे. अरे तू वेळोवेळा जर विषयात गुंतून राहिलास तर मग तू कितीही जपमाळ केले आणि कंठात कितीही तुळशीच्या , रुद्राक्षाच्या माळा घातल्या तर त्या माळा काय करणार? अरे नुसतीच पंडित वाणी बोलून काय उपयोग आहे आणि बोलून काय करशील आणि तू अक्षर पठण केले तर त्यामुळे फक्त तुला अभिमानच होईल तुझी बुद्धी जर शुद्ध झाली नसेल तर मग तू कितीही कुशल गायन केलेस तर त्याचे काय करशील ? तुकाराम महाराज म्हणतात जर तू देवाची सेवा सात्विक व शुद्ध श्रद्धेने केली नाही तर तु देवाच्या आशीर्वादा योग्य कसा काय होणार?

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

Leave a Reply