ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.997

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ९९७

होय सौरी आतां उघडा घाली माथा । परपुरुषी रमल्या बाई त्याची पतिव्रता ॥१॥ कर्मेवीण सौरी झालें आलें संतापाशीं । ज्ञान डौर घेऊनि करी लिंग देह नाशी ॥२॥ रांडव राहूं नका बाई पाहुनी करा वर । तेणें तुम्ही सुखी व्हाल आयव मरण वर ॥३॥ रांडावा ज्या ज्या मरती बाई त्यासी नाना योनी । स्वामी करुनी सुखी होई खुंटती येणी जाणीं ॥४॥ निवृत्तिप्रसादें ज्ञानदेव बोले । स्वामी करुनी सहज निजानंदी डोले ॥५॥

अर्थ:-
सौरी म्हणजे स्वैर वागणारी स्त्री म्हणते. तूं माझ्या सारखी डोक्यावरचा पदर टांकून माथा उघडा कर. भगवंताची माथा उघडा करुन माझ्या प्रमाणे या परमश्रेष्ट पुरुषाशी ज्या रमल्या त्याच श्रेष्ट पतिव्रता होत.मी सकाम कर्माचा त्याग करून सौरी बनले. आणि संतांच्या जवळ जाऊन, हातांत ज्ञान डौर घेऊन, लिंग देहाचा नाश केला. तुम्ही सुद्धा अशा स्वरुपाच्या नवऱ्याशिवाय राहू नका, असाच पति नीट पाहून तुम्ही करा, त्यामुळे तुम्ही सुखी व्हाल. कारण सौभाग्य असतानाच मरण येणे चांगले. ज्या बायका विधवा होऊन मरतील म्हणजे परमात्मप्राप्ती वांचून मरतील त्यांना नानायोनीतून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून तुम्ही त्या परमात्म्याला वरुन सुखी व्हा त्यामुळे तुमची जन्ममरणाची येरझार नाहीसी होऊन जाईल. श्रीनिवृत्तिनाथांच्या कृपेने मी असे सांगत आहे की या श्रीहरिस तुम्ही स्वामी करा व मग सहजानंदांत नित्य डुलत राहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading