ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.361
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३६१
आकाशी मळा लाविला बा एक । वांझेचे बाळक शिंपितसे ॥१॥ अग्नीकुंड मनें बाळकें निर्मिलें । प्रत्ययासी देखिलें मी या लागीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे उफराटें पाहतां । सर्व सौख्यदाता निवृत्ति एक ॥३॥
अर्थ:-
वांझेच्या मुलाने आकाशात मळा लावुन त्याला मृगजळाच्या पाण्याने शिंपुन टाकले आहे. मनरूपी बाळकाने अग्निकुंड कल्पुन त्याला मनानेच पाहात आहे. अंतरदृष्टीने पाहिले तर सौख्यप्राप्ती करुन देणारा सौख्यदाता एक श्रीगुरू निवृत्तिनाथच आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
