ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 360

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३६०

सोहंकारी माया लक्षा आणि देही । निरंजनीं पाही मायाकार ॥१॥ निर्गुण सगुण माया तेचि खरी । प्रसउनी निर्धारी वांझ असे ॥२॥ ज्ञानदेव म्हणे मज माया कृपाळु जाली । तेणें उजळली माझी काया ॥३॥

अर्थ:-

परमात्म्याच्या ठिकाणी जगत आणि जीवाच्या ठिकाणी देहादि ही सर्व मायाच आकारली आहे. सर्व नाम रूपात्मक सगुण जगत व त्याचे कारण अव्यक्त रूप ही दोन्ही रूपे मायाच प्रसवली आहे. वस्तुतः ती मिथ्याच आहे.अजातवादाच्या दृष्टीने वंध्यापुत्राप्रमाणे ती अत्यंत असत् आहे हे खरे पण ज्या मायेने या पसाऱ्यात मी सापडलो होतो. त्याच मायेने सत्त्वगुण प्रधान होऊन मजवर कृपा करून तिने माझी काया उजळली म्हणजे देहभाव नष्ट केला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply