ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.351
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३५१
मने मुरउनी करीं राज रया । प्रणवासी सखया साक्ष होई ॥१॥ देही स्थानमान विवरण करीं आधी । पिंडीची ही शुध्दी प्रथम करीं ॥२॥ औट हात हा देह ब्रम्हांड सगळे यांत । तयाचा निश्चित शोध करा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे विवरण करीं वेगें । निवृत्तीच्या संगे साधिलें हेंचि ॥४॥
अर्थ:-
मनाला मुरवुन त्याला तयार कर.मग ओंकाररूप प्रणव ध्यानाचला साक्ष बनवून. तुझ्या शरीरातील सर्व स्थानांची अगोदर शुद्धी कर. या देहाची या साडेतीन हात असलेल्या शरीरामध्ये जे अंतःकरण आहे. त्यात सर्व ब्रह्मांड उत्पन्न झालेले आहे. म्हणून अगोदर तु त्याचा शोध कर. अगोदर देहात असलेल्या आत्म्याचा शोध करावा. हे निवृतीरायांच्या संगतीमुळे शिकलो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
