ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.344

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३४४

शुन्याचा शेवट डोळा पाहा निराळा । नीळबिंदु सांवळा प्रकाशला ॥ ब्रह्म ज्योतिरूप विसावले जेथ । अनुभव साद्यंत पहा तुम्ही ॥ ऐसे कैलासनाथे सांगितले पार्वती । ज्ञानदेवा निवृत्ति तेचि सांगे ॥

अर्थ:-
शुन्यरूप जो नीलबिद् त्याचा योगाभ्यासाने अनुभव घ्या.तो तेजोमय आहे त्या ठिकाणी चैतन्यरूप ब्रह्म जणू काय विसावा घेण्याकरिता आले आहे. त्याचा अनुभव घ्या. हेच स्वरूप शंकरानी पार्वतीला सांगितले व निवृत्तिरायांनी कृपा करून मला सांगितले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading