ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.342

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३४२

३४२

निर्गुणाचे रंगी रंगले हे मन । सांवळे सगुण ब्रह्म तेंचि ॥ मताभिमानी ऐसा विश्वास न धरिती । वचनी निर्गुण सगुण दोन्ही भिन्न असती ॥ असिपदी जैसे तत्पद ते नाहीं । सावळे ब्रह्म पाहीं तैसे असे ॥ निवृत्तिदास म्हणे चांगया ब्रह्म तेंचि खरें ।सांवळे निर्धारें जाण रया ॥४॥

अर्थ:-
जरी माझे मन निर्गुण स्वरूपांत रंगून गेले तरी शामवर्ण सगुण श्रीकृष्णमूर्ति हीच ब्रह्म आहे. सगुण अगर निर्गुण यापैकी एकाचाच अभिमान धरणारे लोक, हे मानणार नाहित खरोखरी सगुण निर्गुण यांची भिन्नता केवळ शब्दमात्र आहे.जसे ‘तत्त्वमसि’ या महावाक्यांत ‘असि’ पदाहून ‘तत्’ हे पद वेगळे आहे. तरी असि’ पदाने तत् पदाचे एकत्वच सांगितले आहे. त्याप्रमाणे सांवळे परब्रह्म श्रीकृष्ण व निर्गुण परब्रह्म हे दोन्ही एकच आहे. निवृत्तिनाथ माऊली ज्ञानदेवांना सांगतात “हे चांगदेवा सगुण व सांवळा श्रीकृष्ण हा खरोखर परब्रह्मच आहे असे तुं समज”

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading