ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.340

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१० वे, देवापाशी मागणे अभंग ३४०

हो रे तू विठ्ठला हो रे तू विठ्ठला । हो रे तू गोपाळा । क्षेम देई रे वेल्हाळा ॥१॥ तुज पाहतां भुलली पैं चित्ता । काय करू मी आतां येई पंढरीनाथा ॥२॥ पिसुणे परावीं मज काय करावीं । तुजची आठवीं श्रीचरण दाखवीं ॥३॥ तुजवीण वेल्हाळा कै सुख सोहळा । रखुमादेविवरा विठ्ठला शेजे नलगें डोळां ॥४॥

अर्थ:-

हे विठ्ठला वेल्हाळा, मला अलिंगन देणारा हो. पुन्हा पुन्हा मी तुला विनवित आहे. तुला पाहून मला भूल पडली आहे. याला माझा इलाज नाही. हे पांडुरंगा, लवकर ये. कुत्र्यासारखे इतर पाहुणे घेऊन मला काय करावयाचे आहेत ? त्यांची मला जरूरी नाही. मी रात्रंदिवस तुझेच चिंतन करते. मला तुझे चरण दाखव. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठला, तुझ्यावांचून मला कशातही सुख नाही. फार काय सांगू मला रात्री अंथरूणावर झोप देखील येत नाही.असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading