ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.338

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१० वे, देवापाशी मागणे अभंग ३३८

परतोन पाहासी न बोलसी आम्हांसी । तुझीया रूपासी नांव नाहीं ॥१॥ सांगतां नवल पाहतां बरळ । मायामृगजळ देखियेलें ॥२॥ ज्ञानदेवो म्हणे उफराटिये दृष्टी । परतोनियां भेटी देई क्षेम ॥३॥

अर्थ:-

देहादि अनात्म पदार्थावरील दृष्टी फिरवून जर तूं यथार्थ आत्मस्वरूप पाहशील तर तू आमच्याशी बोलणारच नाहीस. याचा अर्थ बोलण्याला तू वेगळा उरणार नाहीस. म्हणून तुला नामरूप नाही त्या तुझ्या विषयी बोलण्याचा व पाहण्याचे प्रयत्न करणे वेडेपणाचे आहे. कारण बोलणे चालणे हे द्वैतात असते. व ते द्वैत मायाकार्य असून मृगजळाप्रमाणे आहे. विचाराने दृष्टी अंतर्मुख करून जर परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न केला तर तो परमात्मा भेट देईल.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading