ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.331

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१० वे, देवापाशी मागणे अभंग ३३१

आल्हादपण काय सांगसी देवा । मन बैसे भावा तैसे करीं ॥ हा घोडा हा राऊत करुनियां दावा । मग पदीं बैसवा ब्रह्माचिये ॥ मी डोलेन आनंदें तुमचेनि प्रसादें । रत्न जेवीं अंधें देखियेलें ॥ करा तत्त्वीं सौरसु म्हणे निवृत्तीदासु । जेथें रात्री दिवसु आथिचिना ॥

अर्थ:-

नसत्या ब्रह्मानंदाच्या गोष्टी देवाला काय सांगतोस अनन्यभावाने मन ठिकाणी वसेल असे कर. नुसत्या शौर्याच्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा हा वा आणि त्याच्यावर बसणारा हा घोडा व बसणारा स्वार असे करुन दाखव. म्हणजे मी मायेला जिंकले आहे असे नुसते तोंडाने बोलू नको तर ही माया मिथ्या आहे आणि तिचे अधिष्ठान सत्य आहे असे समजून घे. आणि मग मनाला ब्रह्मपदी बसव. अशी स्थिती झालेली मी तुमच्या प्रसादाने पाहिली. म्हणजे आनंदाने डोलेन. ही स्थिती मला लाभली म्हणजे आंधळ्याने रत्न पाहिलेवअसे होईल. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान व अज्ञान दोन्ही धर्म नाहीत अशा ज्ञानस्वरुप परमात्म्याच्या ठिकाणी माझे प्रेम वसेल असे कर. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading