ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.323

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३२३

प्रकाशें देखिले त्याहुनि वेगळे । नाहीं ते धरिलें सोहं मार्गे ॥ या मार्गापंथी तू तुझें नाहीं । बिंब हारपले ते तत्त्व पाहीं ॥ बीजाचा प्रकाश तुझा तू नेणंसी । हारपलें मन हे दाही दिशी रया ॥ पुराणप्रसिद्ध निवृत्ति लाधले । गुरूमुखें लक्षीं चोजवले रया ॥

अर्थ:-

योगी लोक समाधीला बसले असता त्यांना काही प्रकाश दिसतो पण तो प्रकाश परमात्मतत्त्व नाही. जो त्यांनी भाव धरिला तेही परमतत्त्व नाही. अशा या सोहं मंत्राचा जप करण्याच्या मार्गात तू तुझ्या स्वतःच्या रुपाने नाहीस. बिंब म्हणजे ईश्वर तत्व हे ज्याठिकाणी लय पावते ते तत्त्व तू पहा बीजाच्या म्हणजे मूळस्वरुपाच्या ठिकाणी असलेला सहज प्रकाश म्हणजे ज्ञान आहे हे तुझे तुलाच माहीत नाही. कारण तो ज्ञानस्वरूप आहे त्या ठिकाणी द्वैत नाही दाहीदिशेला हिंडणारे मन त्या स्वरूपाच्या ठिकाणी लय पावते. याचेच नांव भगवत् दर्शन झाले. अशा तऱ्हेचा पुराणप्रसिद्ध, अनादिसिद्ध तत्त्वमसी महावाक्याचे लक्ष परमात्मा तो श्रीगुरू निवृत्तिरायाच्या उपदेशाने मला प्राप्त झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading