ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.283

👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २८३
संसारकथा प्रपंच चळथा । मनाचा उलथा विरूळा जाणे ॥ होते ते पाहीं नव्हे ते घेई । द्वैत बुद्धि ठायीं गुफों नको ॥ चित्तवृत्ति ध्यानी मनाची निशाणी । भ्रमभेद कानी ऐको नको ॥ ज्ञानदेव गंगा निःसंगाच्या संगा । पावसी अभंगा भेदरहित ॥
अर्थ:-
संसाराच्या गोष्टी म्हणजे केवळ बाष्कळ गोष्टी आहेत. आत्मस्वरूपाचा विचार करणारा जगांत फार विरळा आहे. जे होते ते पहा आणि या अनात्म द्वैतबुद्धीत गुंतु नको. चित्ताला परमात्मस्वरूपाचे नित्य ध्यान करीत जा. भेदभ्रमाची गोष्ट कानांनी ऐकू सुद्धा नको.ज्ञानेश्वर महाराज सांगतात. माझी बुद्धीरूपी गंगा संग रहित परमात्म्याच्या संगतिला लावली आहे. तसे तुही कर म्हणजे तू अविनाशी भेदरहित स्वरूपच होशील.
