नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२८४५
माझे तों फुकाचे काय वेचे कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुम्हांऐसा ॥१॥
कांहींच न वंचीं आजिच्या प्रसंगीं । सकळा ही अंगीं करीन पूजा ॥ध्रु.॥
द्यावें तुम्हीं काहीं हें तों नाहीं आस । असों या उदास देहभावें ॥२॥
तुका म्हणे माझी मावळली खंती । समाधान चित्तीं सर्वकाळ ॥३॥
अर्थ
देवा तुमची सेवा करण्यासाठी मला कोणते कष्ट होणार आहे माझे काय खर्च होणार आहे ते तर मला फुकटचं मिळालेले आहे त्यामुळे मी कोणत्याही टवाळगिरी तेथे करणार नाही आणि तुमच्यासारखा मी क्रियानिष्ठही नाही. देवा मी तुमची सेवा करण्यासाठी आजच्या प्रसंगी कोणत्याही प्रकारची टाळाटाळी करणार नाही टवाळगिरी करणार नाही सर्वांगाने मी तुमची पूजा करील. देवा मी तुमची सेवा केली त्या बदल्यात तुम्ही मला काहीतरी दयावे ही देखील आशा इच्छा अपेक्षा मी करणार नाही कारण मी या देहभावाविषयी उदासीन झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुमची सेवा करणार त्यामुळे माझी सर्व प्रकारची खंतच आता मावळली गेली आहे चित्ताला सर्वकाळ समाधान मिळत आहे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
