नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२८३६
खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुक विनोदें निरांजनी ॥१॥
पचीं पडिलें तें रुचे वेळोवेळां । होतसे डोहळा आवडीसी ॥ध्रु.॥
एकांताचें सुख जडलें जिव्हारीं । वीट परिचारीं बरा आला ॥२॥
पाणी ऐसी बुद्धी नव्हे आतां कदा । लंपट गोविंदा झालों पायीं ॥३॥
आणीक ते चिंता न लगे करावी । नित्य नित्य नवी आवडी हे ॥४॥
तुका म्हणे धडा राहिला पडोन । पांडुरंगीं मन विसांवलें ॥५॥
अर्थ
आम्ही मन आणि जीव यांच्याशीच कौतुकाने विनोदाने संवाद करून व त्यांच्याशीच एकांतामध्ये क्रीडा करू. जे आपल्याला पचनी पडते तेच आपल्याला वेळ वेळा आवडते आणि जे नेहमी आवडते त्याचेच डोहळे होतात. आता एकांत जीवाला फार आवडू लागला आहे आणि आजूबाजूला जे वास्तव्य करतात त्यांचा फार वीट आला आहे हे फार बरे झाले आहे. जगाप्रमाणे वर्तन करणे आता हे बुध्दीला कदापिही पटत नाही आता मी गोविंदाच्या पाई रत झालो आहे. त्यामुळे आता कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज लागत नाही गोविंदा विषयीच नित्यनवीन आवड निर्माण होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या मनाला तसे वळणच लागले असून पांडुरंगाच्या ठिकाणी माझे मन विश्रांती घेत आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
