नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२८२४
उरलें तें भक्तिसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिया ॥१॥
पुरवां तैसी केली आळी । बळी जगदानियां ॥ध्रु.॥
हातीं घेउनि चोरां भातें । दावां रितें बाळका । साजतें हें थोरपण । नाहीं दिणवत्सला ॥२॥
शाहणें तरीं लाड दावी । बाळ जेवीं मातेसी । तुका म्हणे पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥३॥
अर्थ
देवा आता डोळयाने तुझे मुख पाहावे एवढेच एक भक्तीसुख उरले आहे. हे नारायणा तुम्ही माझ्या अंत:करणातील काहीच जाणत नाही असे का बरे ? देवा तुम्ही जगाला दान देणारे बलवान दाता आहात त्यामुळे मी जसा हट्ट तुमच्यापाशी केला आहे तो हट्ट आता पूर्ण करा. देवा तुम्ही खाऊ चोरुन घेऊन लपून ठेवता व माझ्यासारख्या अज्ञानी बालकाला हात रिकामेच असल्याचे भासवता. हे दीनवत्सला तुमच्या थोरपणाला असे वागणे साजेसे दिसत नाही. मोठे मुलं शहाणे असतात तरीपण कधी कधी लाडात येतात आणि आईच्या हातानेच जेवण करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा असाच काही प्रकार आपल्या दोघांचा म्हणजेच देव आणि भक्ताचा आहे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
