नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १९६८
नाही देणे घेणे । गोवी केली अभिमाने ॥१॥
आता का हो निवडू नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥धृपद॥
पाचांमधी जावे । थोड्यासाठी फजित व्हावे ॥२॥
तुज ऐसी नाही । पांडुरंगा आह्मी काही ॥३॥
टाकु तो वेव्हार । तुज बहू करकर ॥४॥
तुका म्हणे आता । निवडू संता हे देखता ॥५॥
अर्थ
देवा आम्ही जे तुला सेवा रुपी मोल दिले त्या बदल्यात तु आम्हाला काही दिले नाही ते तर आम्ही तुलाच दिले आहे परंतु तु दीनानाथ पतितपावन या ब्रिदाच्या अभिमाना मध्येच गुंतुन बसला आहेस. आहो पांडुरंगा आपल्यामध्ये जो घेण्या देण्याचा धंदा, व्यवहार झाला आहे त्याबद्दल तुम्ही निवडा का बर करत नाही म्हणजे तुम्ही घेतले म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात का मी दिले म्हणून मी श्रेष्ठ आहे याचा तुम्हीच विचार करा. देवा या शुल्लक गोष्टीसाठी म्हणजे आपल्या देण्या-घेण्याच्या व्यवहारासाठी आपण आता पंचाती मध्ये जायचे आहे काय म्हणजे आपल्या दोघाचीही चांगलीच फजिती होईल. पांडुरंगा परंतु आम्ही तुझ्यासारखे नाही समजले का. देवा आम्ही या शुल्लक गोष्टीसाठी तुझ्या पुढे येऊन सारखी करकर करू असे आम्ही नाहीत आणि तुला विनाकारण त्रास आम्ही देणार नाही त्यापेक्षा तो व्यवहारच आम्ही टाकून देऊ. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु फक्त संतांनाच घाबरतोस त्यामुळेच त्यांच्या पुढे जाऊनच आपल्या देण्याघेण्याच्या व्यवहाराचा निवाडा आपण करू
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
