१८६८, अभंग :- धावे माते सोई । बाळ न विचारिता काही:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. १८६८
धावे माते सोई । बाळ न विचारिता काही ॥१॥
मग त्याचे जाणे निके । अंग वोडवी कौतुके ॥धृपद॥
नेणे सर्प दोरी । अगी भलते हाती धरी ॥२॥
ताविणे ते नेणे । आणीक काही तुका म्हणे ॥३॥

अर्थ

लहान बाळ ज्याप्रमाणे इकडे तिकडे पळते, त्याच्या सोबत आई आहे हे जाणून आणि बाकी कसलाही विचार न करता चोहोकडे धाव घेते आणि मग त्याची आईदेखील त्याच्यासाठी काय योग्य आहे ते पाहते आणि त्याने केलेल्या लहान अंग चाळ्यांचे आणि तोंड वेडावण्याचे देखील कौतुक करते, तसेच असे हा लहानगा सर्प आणि दोरी ह्यातला फरक न कळल्यामुळे ते हाती धरण्याचा प्रयत्न करतो, इतकेच काय परंतु आगीला देखील मुठीत घ्येण्याचा प्रयत्न करतो, परंतु ह्या सर्वांतून आई त्याचा पदोपदी सांभाळ करते, त्याला वाढविते. तुकाराम महाराज म्हणतात कारण एका आपल्या आईशिवाय त्याला इतर काहीही कळत नसते, तो आई व्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाही, हे पांडुरंगा तुम्ही देखील माझा असाच अंगीकार करा कारण आता मी तुमच्या शिवाय इतर काहीही जाणत नाही, एवढेच काय स्वतःची काळजी घेणे देखील मला आता अवघड होऊन बसले आहे त्यामुळे तुम्हीच काय तो माझा आता योग्य तो सांभाळ करा.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading