नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ७६०
राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एकचि सकळ दुजे नाही ॥१॥
मंगळावाचूनि उमटेना वाणी । अखंडचि खाणी एकी रासी ॥धृपद॥
मोडले हे स्वामी ठायाठाव सेवा । वाढवावा हेवा कोणा अंगे ॥२॥
तुका म्हणे अवघे दुमदुमिले देवे । उरले ते गावे हेचि आता ॥३॥
अर्थ
आता हे सर्व राज्य रामरूप झाले आहे, सर्व प्रजा रामरूप झाली आहे, सर्वत्र राम रूपच आहे, हे सगळे एकच आहे दुसरे काही नाही. माझी वाणी हि एक हरिनाम रूपी माल वाटणारी खान झाली आहे त्यामधून फक्त हरिरूप मंगळ वाणी प्रकट होत आहे. या अवस्थेमुळे “मी दास व तो स्वामी” हा भाव हि नाहीसा झाला, आता कशाची इच्छा वाढवावी? तुकाराम महाराज म्हणतात आता सर्व जग हे ईश्वर रूप बनले आहे त्यामुळे माझ्या अंतःकरणातून फक्त हरीचे प्रेम बाहेर पडते व तेच मी गातो.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
