६९०, कई मात माझे ऐकती कान । बोलता वचन संता मुखी :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. ६९०
कई मात माझे ऐकती कान । बोलता वचन संता मुखी ॥१॥
केला पाडूरंगे तुझा अंगीकार । मग होईल धीर माझ्या जीवा ॥धृपद॥
म्हणऊनि मुख अवलोकितो पाय । हेचि मज आहे थोरी आशा ॥२॥
माझिया मनाचा हाचि पै विश्वास । न करी सायास साधनांचे ॥३॥
तुका म्हणे मज होईल भरवसा । तरलो मी ऐसा साच भावे ॥४॥

अर्थ
संतांच्या मुखी मी असे कधी ऐकेल की, पांडुरंगाने माझा अंगीकार केला आहे तेंव्हा माझ्या जीवाला धीर येईल. मला फार आशा आहे म्हणून मी तुमच्या तोंडाकडे आणि चरणांकडे पाहत आहे. माझ्या मनाला तुझा पुरेपूर विश्वास आहे म्हणून मी दुसऱ्या कोणत्याही साधनांचे प्रयत्न करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या मुखातून मी जेंव्हा हे ऐकेल तेंव्हाच मी समाधानी होईल व मी तरलो असा मला भरवसा येईल

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading