नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ६०९
जीव जायवरी सांडी करी माता । हे तो आश्चर्यता बाळकाची ॥१॥
दुर्बळ की नाही आइकत कानी । काय नारायणी न्यून जाले ॥धृपद॥
क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥२॥
तुका म्हणे नाही वचनासी रुचि । फलकट वेंचि ते ते होय ॥३॥
अर्थ
देवा बालकाच्या आईने बालकाचा जीव जाईपर्यंत जर त्याचा त्याग केला तर ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हे नारायणा तुम्ही दुर्बळ झाला आहात की आमचे बोलणे तुमच्या कानापर्यंत येत नाही नेमके कमीपणा आहे तरी कोठे? अहो देवा मी क्षणाक्षणाला तुमची करून भाकत आहे तरीदेखील तुम्ही माझ्याकडे लक्षही देत नाहीत माझा सांभाळ तुम्ही करत नाही ठीक आहे हे माझे काही तरी अभाग्याचा काळ आहे त्यामुळे तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या बोलण्यात तुम्हाला काही रुची वाटत नाही त्यामुळे आमचे बोलणे फोलपटा सारखे निरस झाले आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
