५७०, अभंग :- आमुची कृपाळू तू होसी माउली । विठ्ठले साउली शरणांगता :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. 570
आमुची कृपाळू तू होसी माउली । विठ्ठले साउली शरणांगता ॥१॥
प्रेमपान्हा स्तनी सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥धृपद॥
भूक तहान दुःख वाटो नेदी सीण । अंतरीचा गुण जाणोनिया ॥२॥
आशा तृष्णा माया चिंता दवडी दुरी । ठाव आम्हा करी खेळावया ॥३॥
तुका म्हणे लावी संताचा सांगात । तेथे न पवे हात कळीकाळाचा ॥४॥

अर्थ
तू आमुची कृपाळू आई आहेस. संसाररूपी त्रासातून त्रस्त होऊन भक्त तुला शरण येतात. त्यांच्यावर प्रेमाची साउली तू घालते. तूझ्या दोन्ही स्तना मध्ये सदासर्वदा प्रेमरूपी दुधाचा पान्हा असतो. तुझ्या दृष्टीतून स्वच्छ अमृत वाहते. तू आपल्या मुलाचे अंतःकरण जाणते. त्यांना तहान भूक, दुख होऊच देत नाही. आमच्या मनातील आशा, तृष्णा, माया, चिंता सर्व काही घालव. व मग आम्हाला तुझ्या स्वरुपात खेळावयास ठाव(जागा) दे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला संतांची संगती दे. संतांच्या संगतीत काळाचे हात पोहचत नाही.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading