नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 546
सदैव तुम्हा अवघे आहे । हातपाय चालाया ॥१॥
मुखी वाणी कानी कीर्ती । डोळे मूर्ती देखावया ॥धृपद॥
अंध बहिर ठकली किती । मुकी होती पागुळ ॥२॥
घरा आंगी लावुनि जागा । न पळे तो गा वाचे ना ॥३॥
तुका म्हणे जागा हिता । काही आता आपुल्या ॥४॥
अर्थ
तुमचे भाग्य आहे की, तुम्हाला सदैव भागवंताचे भजन करण्यासाठी टाळ्या वाजविण्यासाठी हात दिले आहे, स्न्मार्गावरून चालण्यासाठी पाय दिले आहे. भगवंताचे नाम घेण्यासाठी मुखी वाणी दिली, कीर्ती ऐकण्यासाठी कान दिले, विश्वात भरलेल्या भगवंताला पाहण्यासाठी डोळे दिले. परंतु किती तरी लोक आंधळे, बाहीर, मुके, पागळे आहेत कि, यांना भगवंताची सेवा करता येत नाही म्हणून भवसागरात फसले गेले आहे. स्वतःच्या घराला आग लावून तो जर स्वतःच घरात बसला तर तो कसा बरे वाचू शकेल? तुकाराम महाराज म्हणतात आता तरी जागे व्हा आपले खरे हित कशात आहे ते जाणून घ्या.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
