नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 463
आदि मध्य अंत दाखविले दीपे । तो आपणापे यत्न बरा ॥१॥
दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार । तोंतो नव्हे सार एथुनिया ॥धृपद॥
उपायाने सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आले ॥२॥
तुका म्हणे दृष्टि सकळांचे शिरी । वचनेचि करी बैसोनिया ॥३॥
अर्थ
अंधारामध्ये आपण दिवा हातात घेतला तर दिवा आपल्याला अंधारातील एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा भाग मध्यभाग आणि अंत भाग म्हणजे संपूर्ण वस्तूचे ज्ञान करून देतो आणि अंधारामध्ये दिव्याचे साहाय्य घेणे चांगले. अगदी त्याप्रमाणेच या जगामध्ये एक विठ्ठलच सत्य आहे हे मी जाणले आहे व त्याचे दास्यत्व पत्करले आहे म्हणून त्या विठ्ठल धन्याने म्हणजे मालकाने मला परमार्थाचा ठेवा ऐश्वर्य दाखविले आता याच कारणामुळे मी देवा विठ्ठला शिवाय जे काही दिसेल ते सत्यच नाही ते खरे नाही असेच ठरविले आहे. मी हरी भक्तीचा उपाय केला त्यामुळे माझा सर्व विषय भोग नाहीसा झाला आणि देवाची भक्ती मी निरंतर करत राहिलो त्यामुळे विठ्ठलाने मला त्याची सर्व शक्ती देण्यास पात्र केले व माझ्या अंगी सत्ता बळ आले. आणि देवाची जी सत्ता आहे तिचे सामर्थ्य माझ्या अंगी आले. तुकाराम महाराज म्हणतात सर्वांच्या ठिकाणी माझी समान दृष्टी असून बसल्या जागेवरून मी सर्वांना देवाचे वचन एकवितो.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
