नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग – १०७९
राम म्हणता कामक्रोधांचे दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥
राम म्हणता कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नासही ॥धृपद॥
राम म्हणता जन्म नाही गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधी ॥२॥
राम म्हणता यम शरणागत बापुडे । आढळ पद पुढे काय तेथे ॥३॥
राम म्हणता धर्म घडती सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥४॥
राम म्हणता म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाही ॥५॥
अर्थ
राम नाम घेतले की काम , क्रोधाचे दहन होते ते जळून जातात. आणि अभिमान तर देशोधडीला जातो राम म्हटले तर भव बंधन हे देखील तुटून जातात आणि कोणत्याही प्रकारचे स्वप्नातही श्रम येत नाही. रामाचे नामस्मरण जरी केले, स्मरण केले तर जन्म-मृत्यू टळतो म्हणजे गर्भवास पुन्हा पुन्हा होत नाही. आणि तो मनुष्य कधीही दारिद्र्यास पात्र होत नाही. रामाचे नाम घेतले की यम देखील दरिद्री होऊन आपल्याला शरण येतो. आणि त्यामुळे अमरपणा आपल्याला प्राप्त होतो , ध्रुवाला जे अढळपदाची आपल्याला प्राप्त झालेल्या अमरपणा पुढे काय माहिती आहे ? राम नाम घेतले की सर्व धर्म घडतात आणि डोळ्यावर जे अज्ञानाचे पडळ आलेल्या आहे ते क्षणात नाहीसे होतात. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की रामाचे नाम अंतकरणापासून घेतले की हा भवसिंधु सहजच मनुष्य तरुण जाईल त्याचा उद्धार होईल यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
